शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांत १४ वेळा बदली; नागपूरहून आता नियुक्ती जीवन प्राधिकरणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 01:58 IST

तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांत झालेली ही १४वी बदली आहे. जवळपास वर्षातून एकदा तरी त्यांची बदली होतेच.

मुंबई : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे कोरोनाग्रस्त असतानाच राज्य शासनाने बुधवारी त्यांची बदली केली. त्यांच्या जागी राधाकृष्णन हे नागपुरात नवे महापालिका आयुक्त असतील.

मुंढे यांना जानेवारी २०२० मध्ये महापालिका आयुक्त म्हणून नागपुरात पाठविण्यात आले होते. मात्र, पहिल्या दिवसापासून महापौर संदीप जोशी आणि मुंढे यांच्यात खटके उडाले. पुढे सर्वपक्षीय नगरसेवक मुंढे यांच्याविरोधात एकवटले होते. मुंढे यांच्या कोरोनाकाळातील निर्णयांवरून टीका-समर्थनाचे सूर उमटले होते.

तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांत झालेली ही १४वी बदली आहे. जवळपास वर्षातून एकदा तरी त्यांची बदली होतेच. नवी मुंबई, नाशिक महापालिकेचे आयुक्त, जालना, सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे नेहमीच वाद होत आले आहेत. मुंढे यांना कोरोना झालेला असताना त्यांची बदली करण्यात आल्याने टीका होत आहे.मुंढे यांची कारकीर्द : आदिवासी प्रकल्प अधिकारी धारणी, सहायक जिल्हाधिकारी; देगलूर (जि.नांदेड), मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर जिल्हा परिषद, अतिरिक्त आदिवासी आयुक्त; नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम जिल्हा परिषद, खादी व ग्रामोद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जालना जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्हाधिकारी, विक्रीकर सहआयुक्त, नवी मुंबई महापालिका आयुक्त, पुणे पिंपरी-चिंचवड परिवहन सेवा आयुक्त, नाशिक महापालिका आयुक्त, सहसचिव मंत्रालय, एड्स नियंत्रण सोसायटी प्रकल्प संचालक, नागपूर महापालिका आयुक्त आणि आता सदस्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेState Governmentराज्य सरकार