मनपा शाळेमध्ये चोरीचा प्रयत्न

By Admin | Updated: May 10, 2014 20:38 IST2014-05-10T16:50:55+5:302014-05-10T20:38:49+5:30

कात्रज येथील महापालिकेच्या शाळेची भिंत पाडून मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Trying to steal in NMC School | मनपा शाळेमध्ये चोरीचा प्रयत्न

मनपा शाळेमध्ये चोरीचा प्रयत्न

पुणे : कात्रज येथील महापालिकेच्या शाळेची भिंत पाडून मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिना वसंत इंगुळकर (वय ५३, रा. सिध्दी विनायक रेसी. दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. इंगुळकर या विठ्ठलराव गेनजी बेलदरे पाटील प्राथ. विद्यालयाच्या मुखाध्यापिका आहेत. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शाळेची भिंत पाडून आतमध्ये प्रवेश केला. मुख्याध्यापक कक्षाच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून कार्यालयातील दोन्ही लोखंडी कपाटे उचकटली. कपाटातील साहित्य रजिस्टर अस्ताव्यस्त करुन चोरीचा प्रयत्न केला. या घटेनत कोणत्याही वस्तू चोरीला गेल्या नाहीत.

Web Title: Trying to steal in NMC School