साताऱ्यात वकीलास ठार मारण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: May 2, 2016 18:34 IST2016-05-02T16:04:16+5:302016-05-02T18:34:43+5:30
वाहनास बाजूने जाण्याचा इशारा केल्याचा राग मनात धरून सातारा येथील वकील संतोष दत्तात्रय भोसले यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना

साताऱ्यात वकीलास ठार मारण्याचा प्रयत्न
इसबावी (ता़ पंढरपूर) येथील घटना : पत्नीही किरकोळ जखमी
सोलापूर : वाहनास बाजूने जाण्याचा इशारा केल्याचा राग मनात धरून सातारा येथील वकील संतोष दत्तात्रय भोसले (वय २१, रा़ संकल्प पार्क, १३२ रविवार पेठ, सातारा) यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना १ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली़ यात संतोष भोसले यांची पत्नी किरकोळ जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली़
संतोष दत्तात्रय भोसले हे आपल्या पत्नीसोबत स्वत:च्या कारमधून इसबावी (ता़ पंढरपूर) कडे जात होते़ यावेळी बुवाच्या हॉटेलसमोरील रोडवरून ट्रॅक्टर नंबर एमएच २३ बी ४१३९ या गाडीवरील चालक गोविंद शेखर भोसले (वय २१, रा़ इसबावी, ता़ पंढरपूर) याने आपल्या साथीदारांच्या मदतीने भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवून संतोष भोसले यांच्या कारवर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़ याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीसांत फिर्याद दाखल केली असून आरोपी गोविंद भोसले यास पोलीसांनी सोमवार २ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास अटक केली़ याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख हे करीत आहेत़