शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनशीलता शोधण्याचा प्रयत्न करा : तारा भवाळकर

By admin | Updated: February 20, 2016 03:06 IST

परिवर्तनशीलता शोधण्याचा प्रयत्न करा, त्यासह चिंतन करून समाजाचे मन समजून घ्या, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी शुक्रवारी येथे केले.

कोल्हापूर : परिवर्तनशीलता शोधण्याचा प्रयत्न करा, त्यासह चिंतन करून समाजाचे मन समजून घ्या, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी शुक्रवारी येथे केले.येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. महालक्ष्मी हॉलमधील या कार्यक्रमास ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हमीद दाभोलकर उपस्थित होते. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारिणीची बैठक व अधिवेशन आयोजितकेले आहे.डॉ. भवाळकर म्हणाल्या की, आपल्या देशात विविधता आहे. जो पूजापाठ करतो तो कर्मठच असतो असे नाही. त्यामुळे याकडे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने पाहावे. समाजाचे अंतर्बाह्य परीक्षण, वाचन करावे, त्यातून बारकावे समजतील. विविध घटनांबाबत विचार आणि वाचन करून आपल्या पद्धतीने परीक्षण करून ते समाजाच्या प्रयोगशाळेत तपासून पाहावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परिवर्तनशीलता शोधण्याचा प्रयत्न करावा. संत परंपरेतील समाजवैज्ञानिक भूमिका समजून घ्यावी. सध्याच्या स्थितीत आध्यात्मिक लोकशाही गरजेची आहे. मी आणि माझ्याभोवतीचा समाज यातील अनुबंध म्हणजे अध्यात्म असे मी मानते. आध्यात्मिक लोकशाहीद्वारे एकमेकांची मते समजून घ्यावीत. या वेळी बोलताना अविनाश पाटील म्हणाले, समविचारी पक्षांशी एकजूट करून आपली भूमिका निभावण्याची गरज आहे. राजकीय, सामाजिक पातळीवरील बदलांकडे ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी अभ्यासपूर्वक लक्ष द्यावे. कार्यक्रमास कॉ. पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना अभिवादन करून प्रारंभ झाला. (प्रतिनिधी)हत्येमागे वैचारिक विरोधक : हमीद दाभोलकरडॉ. नरेंद्र दाभोलकर, अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास हा अत्यंत असमाधानकारक आहे. ज्या वेळी एकच हत्यार तिन्ही हत्यांमध्ये वापरले गेले हे स्पष्ट होते, त्या वेळी त्याचा एक अर्थ असा होतो की, जर दाभोलकर यांचे मारेकरी वेळीच पकडले असते तर, पुढच्या हत्या टळू शकल्या असत्या. दुसरा अर्थ असा की, या हत्येमागे कोणतीही वैयक्तिक किंवा कौटुंबिक बाब नसून त्याच्यामागे वैचारिक विरोधक आहेत, असे ‘अंनिस’चे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.