शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक; उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 11:47 IST2021-08-03T11:47:06+5:302021-08-03T11:47:16+5:30
Shivshankarbhau Patil is in critical condition : डॉक्टरांनी तपासणी केली असता नाडीचे ठोके अद्याप सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक; उपचार सुरु
शेगाव : श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी तपासणी केली असता नाडीचे ठोके अद्याप सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे
गत तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्यूअरमुळे श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. त्यांच्या सांगण्यानुसारच त्यांच्यावर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात पूर्ण मेडिकल सेटअपसह उपचार सुरू आहेत. त्यांचा रक्तदाब कमी झालेला असून ऑक्सीजनही लावण्यात आलेला आहे.
शिवशंकरभाऊंनी आयुष्यभर आयुर्वेदिक उपचारालाच प्राधान्य दिल्यामुळे त्यांच्या प्रकृतीसदर्भात बुलढाणा येथील आयुर्वेदतज्ञ डॉ. गजानन पडघान यांनाही तिथे बोलविण्यात आल्याची माहिती आहे.