शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

''राम मंदिरप्रश्नी सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवा''

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 06:36 IST

राम मंदिरप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकत आहे.

नाशिक : राम मंदिरप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकत आहे. मात्र गेले काही दिवस काही वाचाळवीर उलटसुलट वक्तव्ये करून या प्रश्नात अडथळा निर्माण करीत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. काश्मीर प्रश्नाच्या अनुषंगाने शरद पवार यांनी केलेले शेजारी राष्टÑांचे समर्थन आश्चर्यजनक असल्याची टीकाही त्यांनी केली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप पंतप्रधानांच्या उपस्थितीत गुरुवारी नाशिकमध्ये झाला. तपोवनातील अटल मैदानावर विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात आले.पंतप्रधान मोदी यांनी पन्नास मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करतानाच राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही टोला लगावला. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराची पहिली वीट शिवसेना ठेवेल, असे वक्तव्य केले होते. यावर मोदी म्हणाले, काही ‘बडबोले’ नेत्यांची राम मंदिराच्या संदर्भातील व्यक्तव्ये अडचणीत भर घालणारी आहेत. प्रत्येकाने सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवावा व वाचाळवीरांनी आपले तोंड बंद ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला. जम्मू-काश्मिरातील ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेच्या स्वप्नांची पूर्ती केली आहे. काश्मीरमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू करण्यापासून सरकारला आता कोणी रोखू शकत नाही, असे सांगतानाच काश्मीरच्या प्रश्नावरून कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या नेत्यांचे वर्तन दुर्भाग्यपूर्ण आहे, असे मोदी म्हणाले,देशाच्या सुरक्षिततेविषयी आम्ही तडजोड करणार नाही, त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी कॉँग्रेसच्या तत्कालीन सरकारवर टीका केली. २००९ मध्ये लष्कराच्या जवानांसाठी एक लाख ८६ हजार बुलेटप्रुफ जॅकेट खरेदी करण्याची मागणी संरक्षण दलाने केली होती. सीमेवर आपले जवान विना बुलेटपु्रफ जॅकेट घालून लढत असतानाही पाच वर्षे कॉँग्रेस सरकारने जॅकेट खरेदी केली नाहीत. मात्र आम्ही सत्तेवर येताच, बुलेटप्रुफ जॅकेटची खरेदी करण्यात आली आणि आंतरराष्टÑीय स्तरावरील बुलेट प्रुफ जॅकेटची निर्मिती भारताने केली. आज शंभरहून अधिक देशात भारत बुलेटप्रुफ जॅकेटची निर्यात करीत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.आजवरच्या अस्थिर राजकारणामुळे महाराष्टÑाची पिछेहाट झाली असून, ज्या वेगाने महाराष्टÑाने देशाला प्रगतीच्या दिशेने पुढे नेणे गरजेचे होते दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. एकट्या मुंबईची चमक धमक सोडल्यास गावपातळीवरील गरीब जनता, शेतकरी, शेतमजूर अजूनही अविकसित राहिले व त्याला अस्थिर राजकारणच कारणीभूत असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदी यांनी केला.याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खा. रक्षा खडसे, सुजय विखे, आ. एकनाथ खडसे उपस्थित होते.>शरद पवारांचे वक्तव्य दुर्दैवीराष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करीत पंतप्रधान मोदी यांनी, पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने जेव्हा काश्मीरच्या प्रश्नी शेजारच्या राष्टÑाच्या शासन व प्रशासनाची स्तुती केली त्याचे आपल्याला दु:ख वाटले, असे सांगून, काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्याच्या निर्णयातही काही लोक राजकीय स्वार्थ शोधत असून, त्यांनी राजकीय द्वेषापोटी सरकारची व माझी स्वत:ची निंदा केली तरी हरकत नाही, मात्र त्यांच्या वक्तव्याचा वापर शेजारच्या राष्टÑांना हत्यार म्हणून होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असा सल्लाही दिला.>मानाची पगडीपंतप्रधान मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला, शिवछत्रपतींचे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मानाची पगडी घालून पंतप्रधान मोदी यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिर