तृप्ती देसाईंचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा इशारा

By Admin | Updated: April 20, 2016 16:31 IST2016-04-20T16:31:26+5:302016-04-20T16:31:26+5:30

तृप्ती देसाईंनी आता हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Trupti Desai signs hajee entry into the dargah | तृप्ती देसाईंचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा इशारा

तृप्ती देसाईंचा हाजी अली दर्ग्यात प्रवेश करण्याचा इशारा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20- शनिशिंगणापूर आणि कोल्हापुरात महिलांना मंदिरात प्रवेश मिळवून दिल्यानंतर तृप्ती देसाईंनी आता हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं आहे. मंदिर प्रवेशानंतर महिलांना आता मस्जिद प्रवेश मिळवून देण्यासाठी तृप्ती देसाई आंदोलन करणार आहेत. महिलांना मस्जिद प्रवेश मिळवून देण्यासाठी तृप्ती देसाई हाजी दर्ग्यापासून सुरुवात करणार आहेत. यासाठी त्यांनी अली सबके लिए फोरमची स्थापना केली आहे. 28 एप्रिलला कार्यकर्त्यांसह हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार असल्याचं यावेळी तृप्ती देसाईंनी सांगितलं आहे. आंदोलनाआधी त्यांनी ट्स्टसोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे. ट्रस्ट महिलांच्या प्रवेशबंदीवर कायम राहिल्यास तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार आहेत.

Web Title: Trupti Desai signs hajee entry into the dargah