Maharashtra Politics: “भाजपने तिकीट दिल्यास १०० टक्के बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढेन”: तृप्ती देसाई  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 01:05 PM2023-04-05T13:05:17+5:302023-04-05T13:07:54+5:30

Maharashtra News: बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि तृप्ती देसाई यांच्यात निवडणुकीवेळी थेट लढत पाहायला मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

trupti desai said if bjp gives candidature 100 percent will fight lok sabha election 2024 from baramati contituacany | Maharashtra Politics: “भाजपने तिकीट दिल्यास १०० टक्के बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढेन”: तृप्ती देसाई  

Maharashtra Politics: “भाजपने तिकीट दिल्यास १०० टक्के बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढेन”: तृप्ती देसाई  

googlenewsNext

Maharashtra Politics: सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे काही महिने राहिले आहेत. सर्वच पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. यातच भाजपने बारातमी मतदारसंघ सर करण्यासाठी कंबर कसली आहे. यातच आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई बारामती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि तृप्ती देसाई यांच्यात थेट लढत पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे गेल्या १४ वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत. त्यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे बारामतीचे खासदार होते. १९९१ पासून हा मतदारसंघ पवार कुटुंबाकडे आहे. पवारांचा गड खालसा करण्यासाठी भाजपने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रीही बारामती मतदारसंघात भेटी देऊन गेले. त्यामुळे पवार कुटुंबाच्या बालेकिल्ल्याला हादरे देण्याचा पूरेपूर प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. यातच आता तृप्ती देसाई यांनी या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

भाजपने तिकीट दिल्यास १०० टक्के लोकसभा निवडणूक लढेन

राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचे काम ठीक सुरू आहे. खूप चांगले काम चालले आहे किंवा खूप वाईट काम सुरू आहे, असे मी म्हणणार नाही. कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी १०० टक्के बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढेन. भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाने मला विचारले तर मी निवडणूक लढेनच. आम आदमी पार्टीचे नेते त्यांच्या काही वरिष्ठ नेत्यांचा निरोप घेऊन मला भेटायला आले होते. आमच्या पक्षात प्रवेश करा, आम्ही तुम्हाला बारातमीतून लोकसभेची उमेदवारी देऊ, असं त्यांनी मला सांगितलं आहे. अनेक पक्षांचे मला फोन येत आहेत. परंतु मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच पुढचा निर्णय घेणार आहे, असे तृप्ती देसाई यांनी सांगितले. 

दरम्यान, तृप्ती देसाई या २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथऱ्यावरून स्त्रियांना पूजा करण्याचा अधिकार मिळावा, यासाठी त्यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. तेव्हापासून अनेक आंदोलने आणि वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे त्या चर्चेत असतात. याशिवाय तृप्ती देसाई बिग बॉस फेमही आहेत. यातच आता बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने देसाई चर्चेत आल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: trupti desai said if bjp gives candidature 100 percent will fight lok sabha election 2024 from baramati contituacany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.