कुंभमेळ्याहून परतणाऱ्यांच्या ट्रकला अपघात; १६ जखमी
By Admin | Updated: September 21, 2015 00:52 IST2015-09-21T00:52:23+5:302015-09-21T00:52:23+5:30
नाशिक येथील कुंभमेळ्याहून घरी परतणाऱ्या भाविकांच्या ट्रकला शनिवारी झालेल्या अपघातात १६ जण जखमी झाले. मुंबई-आग्रा महामार्गावर शिंदखेडा

कुंभमेळ्याहून परतणाऱ्यांच्या ट्रकला अपघात; १६ जखमी
धुळे : नाशिक येथील कुंभमेळ्याहून घरी परतणाऱ्या भाविकांच्या ट्रकला शनिवारी झालेल्या अपघातात १६ जण जखमी झाले. मुंबई-आग्रा महामार्गावर शिंदखेडा तालुक्यातील गोराणे फाट्याजवळ हा अपघात झाला. त्यात दोन ट्रकची धडक झाली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे भाविक मध्य प्रदेशातील विष्णोहरी, जि. मुरेना येथील आहेत. या अपघातात राममतीदेवी बाबूलाल बघेले (५५), अंगुरी दाताराम बघेले (६०), बालाकिशोर टुंडाराम कुशवाह (६५), रघुवीर रामभजन गौड (५५), विमला बालाकिशोर कुशवाह (६०), रामशंकर खुन्नाराम शर्मा (७०), आसाराम सीयाराम शर्मा (७०), दयादास शरयूदास महंत (८०), महाराजसिंह शरयूदास महंत (७८), मुन्शी दयादास महंत (७५), शीला अशोक गौड (४५), शिक्षा अशोक गौड (३), शांतीबाई प्रभूदयाल शर्मा (८०), दीपक नेमीचंद जगा (३०), अशोककुमार श्रीरामसिंह गौड (५०), रामशंकर बाबा हे जखमी झाले.