शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सप्टेंबरमध्येच फुंकणार निवडणूक प्रचाराचे रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 05:09 IST

सत्ताधारी सेना-भाजपाचा मागील चार वर्षांचा कारभार कमालीचा निराशाजनक राहिला आहे.

- विशाल सोनटक्के नांदेड : सत्ताधारी सेना-भाजपाचा मागील चार वर्षांचा कारभार कमालीचा निराशाजनक राहिला आहे. सर्वच पातळ्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत येत्या सप्टेंबरमध्येच काँग्रेस राज्यव्यापी यात्रेच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यांत जाणाऱ्या या यात्रेमध्ये काँग्रेसचे दिग्गज पदाधिकारी सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.खा. अशोक चव्हाण यांनी शनिवारी खास ‘लोकमत’ शी संवाद साधला. विद्यमान सरकारच्या कारभाराला महाराष्टÑातील जनता कंटाळली आहे. शेतकरी, व्यापारी, कर्मचाºयांबरोबरच राज्यातील सर्व घटकांत सरकारकडून फसवणूक झाल्याची भावना असल्याने येणाºया निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने प्रदेश काँग्रेसकडून तयारी सुरु आहे. २३ जिल्ह्यांत प्रदेश काँग्रेसच्या वतीने शिबिरे घेण्यात आली आहेत. राज्यभरात बुथ कमिट्यांचेही काम सुरु आहे. गावागावांतील हे बुथ एकमेकांना जोडण्यात येत आहेत. नुकताच पक्षाच्या वतीने ‘शक्ती अ‍ॅप’चा प्रारंभ करण्यात आला. या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ता थेट काँग्रेसच्या राष्टÑीय कमिटीशी जोडला जाईल तसेच आवश्यकता पडल्यास कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेता येतील. आधुनिक तंत्रज्ञानाचा हा प्रयोग काँग्रेस महाराष्टÑासह देशभरात राबविणार आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले.>सेना-भाजपा, एमआयएम नाण्याच्या दोन बाजूशिवसेना-भाजपा आणि एमआयएम या पक्षांची वाटचाल एकाच दिशेने सुरू आहे. हे पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका करीत जातीयवाद, धर्मांधतेला खतपाणी घालणाºया एमआयएमसोबत समझोता करणे घातक ठरेल. त्यामुळे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी त्या मार्गाने जावू नये.- खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण