शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावरून फुंकली तुतारी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन निवडणूक चिन्हाचे थाटामाटात अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 06:14 IST

शरद पवार हे चाळीस वर्षांनी किल्ले रायगडावर  आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : निवडणूक आयोगाने बहाल केलेले तुतारी चिन्ह संघर्षाची सुरुवात करण्यासाठी प्रेरणादायी आहे. सामान्यांच्या पाठिंब्यातून यश मिळवून जनतेची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळेल, असा आत्मविश्वास नेते शरद पवार यांनी बोलून दाखविला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षातर्फे तुतारी चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, खा. फौजिया खान, आ. जितेंद्र आव्हाड, आ. वंदना चव्हाण, आ. सुमन पाटील, आ. प्रसाद तनपुरे, अनिल तटकरे उपस्थित होते.

सामान्य माणसांत आत्मविश्वास वाढवण्याची कामगिरी शिवछत्रपतींनी त्या काळात केली व त्यामधूनच हे राज्य उभे राहिले. त्यादृष्टीने तुतारी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, असेही शरद पवार म्हणाले. 

४० वर्षांनी रायगडावर शरद पवार हे चाळीस वर्षांनी किल्ले रायगडावर  आले होते. रोपवेने ते किल्ले रायगडवर आल्यानंतर त्यांना पालखीतून राज सदरेवर आणण्यात आले. यावेळी शरद पवार यांच्यासह खासदार, आमदार यांनी भगवे फेटे परिधान केले होते. किल्ले रायगडावर भगवामय वातावरण झाले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या हातात तुतारी हे पक्ष चिन्ह दिले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनीही तुतारी वाजवून रणशिंग फुंकले.

मला एकाच गोष्टीचा आनंद वाटतो की, ४० वर्षांनंतर शेवटी शरद पवार रायगडावर गेले. अजित पवारांना याचे श्रेय द्यावेच लागेल. अजित पवार यांच्यामुळेच अखेर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करण्यासाठी जावे लागले, याचा आनंद वाटतो.  त्यामुळे आता तुतारी कुठे, कशी वाजते? हे भविष्यात दिसेलच.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस