विदर्भ राज्यनिर्मितीच्या आंदोलनातील सच्चा नेता हरपला - मुनगंटीवार
By Admin | Updated: February 18, 2017 14:31 IST2017-02-18T14:31:16+5:302017-02-18T14:31:16+5:30
विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनातील सच्चा नेता हरपला, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे .

विदर्भ राज्यनिर्मितीच्या आंदोलनातील सच्चा नेता हरपला - मुनगंटीवार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनातील सच्चा नेता हरपला, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे .
विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेली कामगिरी बघता त्यांच्यातील कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आपल्याला ठळकपणे दिसतो. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या आंदोलनात त्यांनी स्वतःला झोकून दिले, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.
लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड !
माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाने शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला.
जांबुवंतराव धोटे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, जांबुवंतराव धोटे कायम शेतकरी वंचित आणि मागास घटकांच्या विकासासाठी आग्रही होते. आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने आणि आक्रमकपणे मांडले.
जांबुवंतराव धोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी धोटे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.