शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य!", राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 21:50 IST

Raj Thackeray : केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

मुंबई : गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावरुन चर्चा सुरु होती. यावर आज केंद्र सरकारने मोठा निर्णय दिला आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या बैठकीत औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामांतर करण्यास मंजुरी दिली होती. यानंतर या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता. 

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आभार व्यक्त केले आहेत. औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार... परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणे हेच खरं हिंदवी सुराज्य!, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नामांतरावरुन भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. महाविकास आघाडीचे नेते भाजपवर टीका करत आरोप करत होते. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने 'करुन दाखविले', असा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे 'धाराशिव' ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री @mieknathshinde  जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने 'करुन दाखविले'...!, असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMNSमनसे