ट्रकला धडकून आकुर्डीत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 19:16 IST2017-01-18T19:16:39+5:302017-01-18T19:16:39+5:30
पुणे-मुंबई महामार्गावर आकुर्डी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला.

ट्रकला धडकून आकुर्डीत दुचाकीस्वार ठार
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 18 - पुणे-मुंबई महामार्गावर आकुर्डी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. विजयकुमार चिंदनदास वाणी (वय २३, मूळगाव सोलापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. आकुर्डी येथे ग्रेड सेपरेटरमध्ये टायर पंक्चर झाल्याने एक ट्रक उभा होता. दुपारी दुचाकीवरून आकुर्डी येथून जात असताना तो ट्रकला जोरात धडकला. त्यात गंभीर जखमी झालेल्या विजय याला त्वरित उपचारासाठी महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.