कसारा : कसाराजवळील ओहळाची वाडीजवळ ट्रक, पिकअप व कारचा शुक्रवारी संध्याकाळी भीषण आपघात झाला. यात २७ जण जखमी झाले असून, सर्व जखमी पिकअपमधील आहेत. यापैकी गंभीर जखमी झालेल्या ४ महिला व ३ पुरुषांना घाेटीतील रुग्णालयात दाखल केले आहे. संध्याकाळच्या सुमारास दशक्रिया विधीसाठी आलेले टाकेद येथील ग्रामस्थ डोळखांब येथून टाकेदला जात होते. कसाराजवळील ओहळाचीवाडीजवळ पिकअपच्या चालकाला नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने पिकअप पुढे असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. त्याच दरम्यान पिकअपच्या मागून येणारी कारही जाऊन धडकली. या भीषण अपघातात पिकअपला दोन्ही बाजूने जोरदार धडक बसल्याने पिकअपमधील २७ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले केले.
एअर बॅगमुळे बचावले अपघातात कारच्या एअर बॅग उघडल्याने कारमधील दोन प्रवासी बचावले असून याप्रकरणी कसारा पोलिस ठाण्यात पिकअप चालक विरोधात गुन्हा दाखल झाला असून कसारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावीत पुढील तपास करीत आहेत.
वेळेत मिळाले उपचारअपघातातील जखमींना आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात नेल्यानंतर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. आशू शुक्ला व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमीवर तत्काळ उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रवाना केले.