शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

ट्रकने १२ वाहने उडविली, तीन ठार

By admin | Updated: July 21, 2016 05:21 IST

अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले.

चांदूरबाजार (अमरावती) : अवैध जनावरे वाहून नेणाऱ्या अनियंत्रित भरधाव ट्रकने १२ वाहनांना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर सुमारे २५ जण जखमी झाले. ही घटना चांदूरबाजार ते खरवाडी मार्गावर बुधवारी सायंकाळी घडलीकिशोर इंगळे (४०), त्यांची पत्नी शिल्पा (३८) आणि मुलगा शौर्य (६) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी खारवाडी येथे ट्रक पेटविण्याचा प्रयत्न केला. तर, पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. राज्य राखीव दलाची तुकडी देखील घटनास्थळी दाखल झाली. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. व त्यांनी खारवाडी गावात डेरा टाकला. यात ट्रकचालक व दोन क्लिनरही जखमी झाले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांना ट्रकच्या कॅबिनमध्येच बसवून ठेवले होते.हा ट्रक मोर्शी मार्गावरून अमरावतीकडे जनावरे घेऊन जात होता. जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याने ट्रक आडमार्गाने जात होता. बेदरकारपणे ट्रक चालविणाऱ्या चालकाला रोखण्याचा प्रयत्न चांदूरबाजार येथे काही नागरिकांनी केला. पण तेथून निसटताना चालकाचे नियंत्रण सुटले. पहिल्यांदा त्याने एका कारला जोरदार धडक दिली. त्यात कारचा चेंदामेंदा झाला. त्यानंतर समोरून येणाऱ्या एसटीलाही धडक दिली. पुढे हा ट्रक तब्बल नऊ दुचाकींना धडक देत खारवाडीच्या दिशेने गेला. हे सर्व घडेपर्यंत चांदूरबाजारमधील शेकडो नागरिकांनी दुचाकीने ट्रकचा पाठलाग केला. भ्रमणध्वनीवरून खारवाडी गावाकऱ्यांना हा ट्रक अडविण्यास सांगण्यात आले. तत्पूर्वी हा ट्रक खेड, उदखेड, कोळविहिर या गावांमध्ये देखील अडविण्याचा प्रयत्न झाला. अखेर खारवाडीत नागरिकांनी ट्रक रोखला. ट्रकमध्ये असलेल्या गायींपैकी काही गायी मृत पावल्या होत्या. जिवंत गायींना नागरिकांनी चारा-पाण्याच्या सोईसाठी सुरक्षित स्थळी हलविले.संताप अनावर झाल्याने ट्रक पेटविण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. घ्पोलिसांनी बळाचा वापर केला. (प्रतिनिधी)