शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

अजून दोन दिवस त्रास सहन करा - मध्य रेल्वे, तीन दिवसांत ३९ एक्स्प्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 5:02 AM

मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली गेली. बुधवारी दुपारनंतरही रेल्वे अडखळतच धावत आहे. उपनगरीय रेल्वेचे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतुक वेळपत्रकानुसार सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत

मुंबई : मंगळवारच्या मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली गेली. बुधवारी दुपारनंतरही रेल्वे अडखळतच धावत आहे. उपनगरीय रेल्वेचे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतुक वेळपत्रकानुसार सुरु होण्यास आणखी दोन दिवस लागणार आहेत. रेल्वे ट्रॅकवर पाण्याची पातळी जास्त असल्याने या पाण्यामुळे मरेवरील ३५ लोकलच्या एक्सल मोटरमध्ये तांत्रिक बिघाड झाले आहेत, परिणामी रविवारच्या वेळापत्रकानुसार गुरुवारी गाड्या चालविण्यात आल्या असून आणखी दोन दिवस त्रास सहन करा, असे आवाहन मध्य रेल्वतर्फे प्रवाशांना करण्यात आले आहे.मंगळवारच्या पावसामुळे कुर्ला, सायन, माटुंगा आणि परेल स्थानकातील रेल्वे रुळांवर खुप पाणी साचले होते. सुमारे १२ ते १५ इंचापर्यत पाणी या रुळांवर होते, पाण्यातच लोकल तासनतास उभ्या राहिल्यामुळे मरेच्या ताफ्यातील ३५ लोकलच्या एक्सल मोटरमध्ये पाणी गेले आहे. नादुरुस्त लोकल दुरुस्तीचे काम रेल्वेप्रशासन युद्ध पातळीवर करीत आहे. मरेच्या ताफ्यात एकुण १४५ रेक आहेत, त्यापैकी १२२ रेकच्या सहाय्याने रोज सुमारे १६०० फेºया चालवल्या जातात. पावसामुळे १०० रेकच्या मदतीने फेºया होत आहे. शनिवारपर्यंत या सर्व लोकल दुरुस्त करुन त्या सेवेत आणल्या जातील, असे मध्य रेल्वेचे डीआरएम रविंद्र गोयल म्हणाले.दुरांतो एक्सप्रेसचा अपघात होवून आता अडीच दिवस उलटले तरिही अद्याप रेल्व मार्ग पुर्ववत करण्याचे काम सुरूच आहे. या कामामुळे शुक्रवारी आणि शनिवारी धावणाºया तब्बल २५ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. ३१ आॅगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर या तीन दिवसातील तब्बल ३९ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यापैकी गुरूवारी १४ एक्सपे्रस रद्द करण्यात आल्या असून, १ सप्टेंबरच्या २० आणि २ सप्टेंबरच्या ५ एक्सप्रेस रद्द केल्या आहेत.बुधवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी मरेचा डाउन मार्ग वाहतुकीसााठी खुला झाला असला तरी अप मार्गावर चिखल येत असल्यामुळे वाहतुक सुरु करण्यासाठी आणखी वेळ लागणारआहे, असे डीआरएम रविंद्र गोयल यांनी गुरूवारी सांगितले.

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी