अनैतिक संबंधातून तिहेरी हत्याकांड
By Admin | Updated: January 25, 2015 01:38 IST2015-01-25T01:38:29+5:302015-01-25T01:38:29+5:30
विवाहित प्रेयसीला तिच्या दिरासोबत पाहून संतापलेल्या प्रियकराने मध्यरात्री घरात घुसून तिच्यासह दिराची हत्या केली.

अनैतिक संबंधातून तिहेरी हत्याकांड
वरूड (जि. अमरावती) : विवाहित प्रेयसीला तिच्या दिरासोबत पाहून संतापलेल्या प्रियकराने मध्यरात्री घरात घुसून तिच्यासह दिराची हत्या केली. त्यानंतर अनैतिक संबंधांवर आक्षेप घेणाऱ्या स्वत:च्या पित्याचाही गावठी पिस्तूलने गोळी झाडून खून केला. ही घटना बारगाव येथे शुक्रवारी मध्यरात्रीदरम्यान घडली. अंजिरा उईके (२७), गोपाल उईके (२२) व पंजाबसिंग भादा (५५) अशी मृतांची नावे आहेत. मनोजसिंग भादा (२७) असे आरोपीचे नाव आहे.
बारगाव येथे भादा व उईके कुटुंब शेजारी राहतात. मृत अंजिरा उईकेचा पती २०१२ पासून बेपत्ता असल्याने अंजिरा ही सागर (१०), अमित (८) व दीर गोपाल उईकेसह येथे राहत होती. मनोजसिंहसोबत अंजिराचे अनैतिक संबंध असल्याचा संशय मनोजसिंगचे वडील पंजाबसिंग यांना होता. त्यावरून मनोजसिंग व पंजाबसिंग या पिता-पुत्रांमध्ये खटके उडत होते. पोलिसांनी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास घटनास्थळ गाठून मृतदेहांचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)