त्र्यंबकच्या गर्भगृहात प्रवेशास मनाई
By Admin | Updated: April 15, 2016 17:47 IST2016-04-15T17:41:07+5:302016-04-15T17:47:07+5:30
त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात जाऊन दर्शन करण्यास मज्जाव केल्याप्रकरणी स्वराज्य महिला संघटनेच्यावतीने पुरोहित, ग्रामस्थ अशा २००-२५० जणांविरूद्ध त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

त्र्यंबकच्या गर्भगृहात प्रवेशास मनाई
गुन्हा दाखल : स्वराज्य महिला संघटनेची पोलिसात तक्रार
ऑनलाइन लोकमत
त्र्यंबकेश्वर, दि. १५ - त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात जाऊन दर्शन करण्यास मज्जाव केल्याप्रकरणी स्वराज्य महिला संघटनेच्यावतीने पुरोहित, ग्रामस्थ अशा २००-२५० जणांविरूद्ध त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मंदिरातील गर्भगृहाच्या प्रवेशासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, मात्र आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला तसेच धक्काबुक्कीही करण्यात आल्याचा आरोप स्वराज्य महिला संघटनेच्या अध्यक्ष वनिता गुट्टे यांनी केला आहे.