‘तिरंगा मेरी जान है’!

By Admin | Updated: August 14, 2016 18:35 IST2016-08-14T18:35:32+5:302016-08-14T18:35:32+5:30

स्वातंत्र्य दिन असो की गणतंत्र दिन, राष्ट्रध्वजाची नि:शुल्क ‘इस्त्री’ करून देत, तिरंगाही मेरी जान है’ या भावनेतून अकोल्यातील नरेश बुंदेले या युवकाने गेल्या ३० वर्षांपासून राष्ट्रभक्ती जोपासली आहे.

'Tricolor is my life'! | ‘तिरंगा मेरी जान है’!

‘तिरंगा मेरी जान है’!

‘इस्त्री’च्या व्यवसायातून ‘नरेश’ने जोपासली राष्ट्रभक्ती
 
संतोष येलकर
अकोला - स्वातंत्र्य दिन असो की  गणतंत्र दिन, राष्ट्रध्वजाची नि:शुल्क ‘इस्त्री’ करून देत, ‘तिरंगा सबकी शान है, तिरंगाही मेरी जान है’ या भावनेतून अकोल्यातील नरेश बुंदेले या युवकाने गेल्या ३० वर्षांपासून राष्ट्रभक्ती जोपासली आहे.
अकोला शहरातील आकोट फैल पोलीस ठाण्याजवळ ४८ वर्षीय नरेश गिरधारीलाल बुंदेले कपड्यांना ‘इस्त्री’ करून देण्याचा  व्यवसाय करतो. पोटाची खळगी भरण्यासाठी इस्त्रीचा व्यवसाय करताना, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाºया राष्ट्र क्रांतिकारकांच्या त्यागाचे स्मरण आणि राष्ट्रप्रेमाची भावना त्याने जोपासली आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पृष्ठभूमीवर ध्वजारोहणासाठी इस्त्रीसाठी आणलेल्या राष्ट्रध्वजाची नि:शुल्क इस्त्री करून देण्याचे काम गत ३० वर्षांपासून नरेश करीत आहे. १५ आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येणाºया स्वातंत्र्यदिनी झेंडा वंदनासाठी नरेश बुंदेलेच्या  ‘ड्रायक्लिनर्स’मध्ये आकोट फैल पोलीस ठाणे, रेल्वे स्टेशन, महानगरपालिका शाळा, आपातापा रोडवरील वीज उपकेंद्र व इतर शासकीय कार्यालयांसह परिसरातील विविध चौकातील संस्था, संघटना आणि शहरानजिकच्या खरप, पाचमोरी, शिलोडा, नायगाव व इतर गावातील नागरिक तिरंगी ध्वज इस्त्रीकरिता आणतात. १२, १३ व १४ आॅगस्ट असे तीन दिवस राष्ट्रध्वजाची नि:शुल्क इस्त्री करून देण्याचे काम नरेश बुंदेले करीत असतो. त्यामुळे इस्त्रीचा व्यवसाय करताना गत तीस वर्षांपासून राष्ट्रध्वजाची नि:शुल्क इस्त्री करून देण्याचे काम करणाºया नरेशने राष्ट्रभक्ती जोपासल्याचा प्रत्यय येत आहे. देशासाठी मी काही करू शकत नसलो, तरी इस्त्रीच्या व्यवसायातून राष्ट्रध्वजाची नि:शुल्क इस्त्री करून देण्याचे काम करू शकतो, असे नरेशने सांगितले. ‘तिरंगा देशकी शान है, तिरंगाही मेरी जान है’ अशा शब्दात नरेशने राष्ट्रध्वजावरील प्रेम व्यक्त केले आहे.

 

Web Title: 'Tricolor is my life'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.