तोतया डॉक्टरकडून व्यापाऱ्यांची फसवणूक

By Admin | Updated: April 30, 2016 00:39 IST2016-04-30T00:39:26+5:302016-04-30T00:39:26+5:30

डॉक्टर असल्याचे सांगत रुग्णालयासाठी एसी, फ्रीज, कुलर आणि सीलिंग पंख्यांची खरेदीची आॅर्डर देण्याच्या आमिषाने दोन व्यावसायिकांची ९ लाख ५९ हजारांची फसवणूक

Trick cheating trader | तोतया डॉक्टरकडून व्यापाऱ्यांची फसवणूक

तोतया डॉक्टरकडून व्यापाऱ्यांची फसवणूक

जिल्हा परिषदेचा ‘मार्च एंडिंग’ सरता सरेना! : नवीन वर्षातील कामांना मुहूर्त नाही
भंडारा : शासकीय आर्थिक वर्ष संपवून जवळपास एक महिना होत असतानाही जिल्हा परिषदेत अद्यापही ‘मार्च एंडिंग’ची कामे धडाक्यात सुरू आहेत. त्यामुळे मिनीमंत्रालयाचे आर्थिक वर्ष केव्हा संपणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासनाकडून जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागाच्या योजनांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागात पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती तसेच सभापती यांनी सुचविलेले विकासाची कामे तसेच लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपात विविध साहित्य वाटप केले जाते. यासाठी मात्र शासनाने खर्च व योजनांची अंमलबजावणी याकरिता टाईम टेबल ठरवून दिला आहे. ही सर्व कामे आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत खर्च करणे अपेक्षित आहे. यासाठी ३१ मार्च हा शासकीय आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या कालावधीत निधी खर्च होणे क्रमप्राप्त आहे. शासनाच्या धोरणानुसार आर्थिक वर्षातील खर्चाचा लेखा-जोखा हा मार्च एंडिंगपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.
यामध्ये महिला व बालकल्याण, बांधकाम, समाजकल्याण, कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण, पाणीपुरवठा, सिंचन, आरोग्य अशा सर्वच विभागांना राज्य शासन, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा निधीमधून योजनांसाठी उपलब्ध होणाऱ्या कोट्यवधी रूपयांतून ही सर्व कामे केली जातात. मात्र दरवर्षीप्रमाणे चालू आर्थिक वर्षातील कामे तर केली जातात. याशिवाय मागील वर्षातील जुनी कामेसुद्धा याच धामधुमीत उरकवून घेण्याचा प्रकार जिल्हा परिषदेत नित्याचीच बाब झाली आहे. याचप्रमाणे यंदा सन २०१५-१६ मधील आर्थिक वर्षातील जिल्हा परिषदेत आर्थिक व्यवहार शासकीय आर्थिक वर्ष ३१ मार्च हा संपवून जवळपास २८ दिवसांचा अवधी उलटून गेल्यावरही जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना व विकासकामांची मार्च एंडिंगची प्रशासकीय कारवाई जिल्हा परिषदेत अद्यापही सुरू असल्याने सध्या झेडपीचा मार्च एडींग सरता सरेना, अशी प्रचिती या प्रकारामुळे येऊ लागली आहे. त्यामुळे मार्च एंडिंग केव्हा संपणार, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Trick cheating trader