दिवंगत नेत्यांना विधिमंडळात श्रद्धांजली

By Admin | Updated: December 8, 2015 01:34 IST2015-12-08T01:34:11+5:302015-12-08T01:34:11+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे हे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या ज्ञानाचा लाभ सभागृहासह सर्वच सदस्यांना झाला,

Tribute to the departed leader | दिवंगत नेत्यांना विधिमंडळात श्रद्धांजली

दिवंगत नेत्यांना विधिमंडळात श्रद्धांजली

नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे हे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या ज्ञानाचा लाभ सभागृहासह सर्वच सदस्यांना झाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत आपली शोक संवेदना व्यक्त केली.
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्यासह राम कापसे,माजी राज्यपाल ओम प्रकाश मेहरा,मणिपूरचे राज्यपाल, तसेच माजी विधानसभा सदस्य, माजी मंत्री डॉ. सय्यद अहमद, माजी मंत्री मदन विश्वनाथराव पाटील, विधानसभा सदस्य मोहनराव पांडुरंग गुदगे, अमृतराव गंगाराम राणे, रामजी महादू वरठा, भगवानशहा जीवनशहा मसराम, बाबुराव महादेव नरके, निवृत्तीराव भिकाजी गायधनी यांच्या निधनाबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अजित पवार, शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे,समाजवादी पार्टीतर्फे अबु आजमी यांनी तर शेतकरी कामगार पक्षातर्फे धैर्यशील पाटील, माकपतर्फे जीवा पांडू गावित यांच्यासह पतंगराव कदम, संजय केळकर, योगेश घोलप यांनीही आपली शोकसंवेदना व्यक्त केली. शेवटी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यंनी दिवगंत सदस्यांच्या निधनानिमित्त आपली शोकसंवेदना व्यक्त केली.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत या नेत्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. या नेत्यांनी नेहमी जनतेलाच डोळ्यासमोर ठेवून कामे केली व राज्याला नवीन ओळख दिली होती. यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री दीपक सावंत, शरद रणपिसे, जयंत पाटील, प्रभाकर घाडगे, जोगेंद्र कवाडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Tribute to the departed leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.