तलासरी : तालुक्यातील उधवा-कासपाडा येथील एका महिलेने आपल्या नवर्याच्या त्रासाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. उधवा-कासपाडा येथील गीता रामजी बुजड (२९) हिला तिचा नवरा त्रास द्यायचा व तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. नेहमीच्या या प्रकाराला कंटाळून अखेर तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत तलासरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होऊन रामजी बुजड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
आदिवासी महिलेची आत्महत्या
By admin | Updated: May 17, 2014 21:57 IST