पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड

By Admin | Updated: July 2, 2016 03:19 IST2016-07-02T03:19:35+5:302016-07-02T03:19:35+5:30

रेवदंडा येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गेली चार वर्षे सर्व प्रमुख रस्त्यांवर झाडे लावली आहेत.

Tree for environment conservation | पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड


नेरळ : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ यासाठी एक ध्येय समजून पर्यावरण राखण्यासाठी रेवदंडा येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून गेली चार वर्षे सर्व प्रमुख रस्त्यांवर झाडे लावली आहेत. केवळ झाडे लावून प्रतिष्ठान थांबले नाहीत तर त्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी श्री सदस्य घरातील काम असल्यासारखे करीत आहेत.
कर्जत तालुक्यात श्री सदस्यांनी शुक्रवारी दिवसभरात विविध आठ ठिकाणी तब्बल ९२ हजार झाडांची लागवड केली. कर्जत तालुक्यात वन, महसूल विभाग तसेच शासनाचे सर्व विभाग यांच्या माध्यमातून कृषी दिनी वृक्षारोपण कार्यक्र म राबविला जाणार आहे. मात्र जिल्ह्यात पर्यावरण टिकून राहावे, यासाठी गेली काही वर्षे सातत्याने काम करणारे रेवदंडा येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने शासनाच्या या उपक्र मात पुढाकार घेतला आहे. केवळ रायगड जिल्ह्यातील नाही तर राज्यातील अनेक रस्ते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हिरवेगार झाले आहेत.
तालुक्यातील बळीवरे, नालधे, किरवली, वांजळे, कळंब, माथेरान, नेरळ आणि शेलू अशा आठ ठिकाणी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाडे लावण्यात आली. या आठ ठिकाणी मिळून तब्बल ९२ हजार झाडे दिवसभरात लावण्यात आली. या सर्व झाडांचे संगोपन कर्जत तालुक्यातील श्री सदस्य करणार असल्याचे धर्माधिकारी प्रतिष्ठानने जाहीर केले आहे. बळीवरे येथील टेकडी पुढील काही वर्षांत हिरवीगार होणार आहे.

Web Title: Tree for environment conservation