भिवंडीत कुपाेषित बालकांवर उपचार सूरू,एकाची प्रकृती चिंताजनक
By Admin | Updated: October 26, 2016 17:34 IST2016-10-26T17:33:07+5:302016-10-26T17:34:58+5:30
भिवंडीमध्ये कुपाेषित बालकाची संख्या वाढत असून 3 बालकांवर भिवंडीच्या इंदिरागांधी रूग्णालयात उपचार सूरू आहेत. राेहित वाघ या कुपाेषित बालकाची प्रकृती चिंताजनक

भिवंडीत कुपाेषित बालकांवर उपचार सूरू,एकाची प्रकृती चिंताजनक
राेहिदास पाटील / ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. 26 - भिवंडीमध्ये कुपाेषित बालकाची संख्या वाढत असून 3 बालकांवर भिवंडीच्या इंदिरागांधी रूग्णालयात उपचार सूरू आहेत. राेहित वाघ या कुपाेषित बालकाची प्रकृती चिंताजनक आहे.
येथील देपाेली गावातील राेहित वाघ वजन तीन कीलो, माेनीका वाघ वजन तीन कीलेा आठ ग्रॅम या दाेघा जूळ्या भांवडाना व धामनगांव पंचायतीच्या धापसीपाडा येथील सुप्रिया पागी यांना अनगांव आराेग्य केंद्रामधून इंदिरागांधी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून राेहित वाघ या बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकियअधिकारी डॉ. संदिप गवई यांनी दिली.