शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या प्रवासी नेत्यांना ढाब्यावर जेवण्यास मनाई, कार्यकर्त्यांच्या घरीच जेवा; पदाधिकाऱ्यांकडे काहीही न मागण्याच्या सूचना

By यदू जोशी | Updated: September 4, 2024 08:54 IST

Maharashtra Assembly Election 2024: ढाब्यावर जेवण्याचे प्रकरण मध्यंतरी राज्य भाजपमध्ये गाजले. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सात-आठ राज्यांमधील जे नेते तब्बल दोन-अडीच महिने महाराष्ट्रात राहणार आहेत, त्यांना ढाब्यावर, बड्या हॉटेलांमध्ये जेवण्यास मनाई करण्यात आली आहे.

- यदु जोशीमुंबई - ढाब्यावर जेवण्याचे प्रकरण मध्यंतरी राज्य भाजपमध्ये गाजले. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सात - आठ राज्यांमधील जे नेते तब्बल दोन - अडीच महिने महाराष्ट्रात राहणार आहेत, त्यांना ढाब्यावर, बड्या हॉटेलांमध्ये जेवण्यास मनाई करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडेच जेवण, नाष्टा करा आणि चहाही तिथेच प्या, असे त्यांना सांगितले.

राज्याच्या विविध भागांमध्ये परराज्यातील बडे नेेते, मंत्री, खासदार यांना विधानसभेची निवडणूक संपेपर्यंत मुक्कामी राहण्यास सांगण्यात आले. या प्रवासी नेत्यांची आणि विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांची आठ तासांची बैठक ३१ ऑगस्टला नागपुरात झाली. त्यात ढाब्यावरील जेवणासह विविध सूचना देण्यात आल्या. 

गुप्तता पाळली जात आहे- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्ती मानले जाणारे गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल हे चार दिवसांपासून अमरावती शहरामध्ये मुक्कामी आहेत. - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य कार्यकर्ते, सामान्य   माणसांना गावोगावी जाऊन ते त्यांच्या भावना जाणून घेत वर रिपोर्टिंग करत असल्याची माहिती आहे, असे बरेच नेते प्रसिद्धी माध्यमांना माहिती होऊ न देता गुप्त मोहिमेवर राज्यात फिरत आहेत.

बड्या नेत्यांना एकेक विभाग दिला वाटून - नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होईल, असा अंदाज आहे. एक - दोन राज्यांच्या बड्या नेत्यांना एकेक विभाग (जसे विदर्भ, मराठवाडा) वाटून देण्यात आले.- याशिवाय एकेका नेत्याला जिल्हा, विधानसभानिहायदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. १९८० पासून भाजपचे किंवा त्याही आधी जनसंघाचे कोण कोण नेते आहेत, त्यांना भेटा, विश्वासात घ्या आणि सक्रिय करा, असे त्यांना सांगण्यात आले आहे.

२२ कलमी कार्यक्रमहे जे प्रवासी नेते आहेत, त्यांनी काय काय करायचे, याची २२ कलमे असणारी यादीच त्यांनी दिली आहे.पक्ष कार्यालय, कार्यकर्ते सक्रिय करा, बूथ पातळीपासून कार्यकर्त्यांच्या बैठका घ्या, पक्षामध्ये अंतर्गत मतभेद असतील तर ते मिटवा, पक्षाच्या विविध आघाड्यांना सक्रिय करा, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थींशी संपर्क करण्याची यंत्रणा उभारा आदी कार्यक्रम त्यांना देण्यात आले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाfoodअन्न