प्रवासी होडी व्यावसायिकांना न्याय मिळणार

By Admin | Updated: August 23, 2015 00:32 IST2015-08-23T00:32:28+5:302015-08-23T00:32:28+5:30

स्थानिक व्यावसायिकांमार्फत पर्यटकांच्या सेवेसाठी प्रवासी होडी वाहतूक सुरू आहे. प्रवासी होड्यांची संख्या वाढत असून, बंदराची क्षमता पाहून किमान वर्षभर नव्या प्रवासी होडीस परवानगी देऊ नये.

Travelers will get justice for the passengers | प्रवासी होडी व्यावसायिकांना न्याय मिळणार

प्रवासी होडी व्यावसायिकांना न्याय मिळणार

मालवण : स्थानिक व्यावसायिकांमार्फत पर्यटकांच्या सेवेसाठी प्रवासी होडी वाहतूक सुरू आहे. प्रवासी होड्यांची संख्या वाढत असून, बंदराची क्षमता पाहून किमान वर्षभर नव्या प्रवासी होडीस परवानगी देऊ नये. स्थानिक व्यावसायिक, मच्छीमारांच्या मागणीनुसार जेटीचे नूतनीकरण व्हावे. प्रतिप्रवासी ५0 रुपये भाडे आकारणीत वाढ करून व्यावसायिकांना परवडेल अशी प्रतिप्रवासी १०० रुपये भाडे करण्याची मागणी किल्ला प्रवासी होडी वाहतूक शिष्टमंडळाच्या वतीने बंदर विकास राज्यमंत्री व बंदर विभागाचे आयुक्त यांच्यासमोर मंत्रालयात करण्यात आली. याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन न्याय दिला जाईल, अशी भूमिका घेण्यात येईल, अशी ग्वाही बंदर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली. मुंबई मंत्रालय येथे बंदर विकास राज्यमंत्री पाटील यांच्या दालनात शुक्रवारी मालवणातील किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक संघटनेनेने भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्र्यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Travelers will get justice for the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.