शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

ST Bus Fare Hike: प्रवास महागणार; दिवाळीसाठी एसटीने दिले १०% हंगामी भाडेवाढीचे चटके!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:31 IST

MSRTC ST Bus Fare Hike: १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात मिळणार तब्बल ११०० कोटी

मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने दिवाळी हंगामासाठी तिकीट दरामध्ये १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी ती लागू राहणार आहे. यामुळे एसटीच्या तिजोरीत सुमारे एक हजार ते ११०० कोटीचा महसूल जमा होईल.  भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार आहे.  यावर्षी धनत्रयोदशी १८ ऑक्टोबर रोजी आहे. दरम्यान, शाळांना सुट्ट्या लवकर पडत असल्याने आणि काही दिवस आधीच प्रवासी संख्या वाढते. त्यामुळे जादा बसगाड्या १५ ऑक्टोबरपासून चालवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  यासह त्यांचा परतीचा प्रवास लक्षात घेऊन ५ नोव्हेंबरपर्यंत वाढीव बसगाड्या सुरू ठेवण्यात येणार. त्यामुळे या काळासाठी भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. 

दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते. गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याची एसटी महामंडळाला परवानगी आहे. त्यानुसार गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरुपाची भाडेवाढ केली जाते. ही वाढ साध्या, विठाई, शिवशाही, निमआराम बसकरिता लागू असणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीकरिता भाडेवाढ लागू असणार नाही.

हंगामी भाडेवाढीनंतर तिकीट (प्रति टप्पा) 

गाडीचा प्रकार                       सध्याचे                     दिवाळीतसाधी (मिडी,साधी)                १०.०५ पैसे               ११.०५पैसेजलद                                    १०.५पैसे                   ११.०५पैसेनिमआराम                            १३.६५पैसे                 १५ रुपयेसाधी शयनआसनी                 १३.६५ पैसे               १५ रुपयेसाधी शयनयान                      १४.७५पैसे              १६.२५पैसेएसी शिवशाही(आसनी)          १४.२०पैसे              १५.६५ पैसेएसी जनशिवनेरी(आसनी)       १४.९०पैसे              १६.४०पैसे

भाडेवाढीनंतरचे तिकीट दर(अंदाजित) 

मार्ग                                        सध्याचे         दिवाळीत परळ-कोल्हापूर(साधी)           ६४०रु.          ७००रु.मुंबई-मालवण(शिवशाही)      १३००रु.          १४००रु.मुंबई-जळगाव(स्लीपर)          ११००रु.          १२५०रु.मुंबई-छ. संभाजी नगर  (साधी)         ८००रु.            ९०० रु.मुंबई-सोलापूर(साधी)    ७५० रु.    ८५० रु. मुंबई-जालना( साधी)    ८००रु.    ९०० रु.मुंबई-लातूर(साधी)    ९०० रु.    १०००रु.मुंबई-सांगली (साधी)    ७३० रु.    ८००रु.मुंबई- रत्नागिरी(साधी)    ६०० रु.    ७००रु.

English
हिंदी सारांश
Web Title : Travel to Cost More; ST Announces 10% Diwali Fare Hike!

Web Summary : Maharashtra State Transport Corporation (ST) has declared a 10% fare hike for Diwali, effective October 15th to November 5th. This increase, impacting various bus types excluding Shivneri on the Mumbai-Pune route, aims to boost revenue during the festive season. Long-distance travel will become costlier.
टॅग्स :state transportएसटीticketतिकिटDiwaliदिवाळी 2024