मनोर येथे लवकरच ट्रॉमा सेंटर- आरोग्यमंत्री

By Admin | Updated: August 22, 2016 03:35 IST2016-08-22T03:35:46+5:302016-08-22T03:35:46+5:30

मनोर येथे ट्रॉमा सेंटरसाठी जागा मिळाली असून तेथे ते सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी येथे दिली.

The trauma center soon at Manor - Health Minister | मनोर येथे लवकरच ट्रॉमा सेंटर- आरोग्यमंत्री

मनोर येथे लवकरच ट्रॉमा सेंटर- आरोग्यमंत्री

सुरेश काटे/ आरिफ पटेल,

मनोर/तलासरी- महामार्गावर मनोर येथे ट्रॉमा सेंटरसाठी जागा मिळाली असून तेथे ते सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी रविवारी येथे दिली. तलासरी ग्रामीण रुग्णालयालाची त्यांनी पाहणी केली. या वेळी अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयन्त केला परंतु, मंत्री भेटी वेळी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित असलेल्या पत्रकार व कार्यकर्त्यांनी तलासरी ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था त्यांच्या लक्षात आणून दिली या वेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले.
त्यांच्या समवेत आमदार अमित घोडा, तसेच पालघर जिल्हा शिवसेनेचे उत्तम पिंपळे इत्यादी सह आरोग्य अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते आले असतांना स्थानिक आमदार व खासदार उपस्थित नव्हते.
तलासरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आदिवासी आरोग्य सेवे पासून वंचित राहतात तसेच औषध निर्माण अधिकाऱ्यांसह क्ष किरण तंत्रज्ञ , प्रयोग शाळा तंत्रज्ञ ,इत्यादी महत्वाची पदे रिक्त असल्याने आदिवासी रुग्णांना बाहेरचे महागडे उपचार व तपासण्या कराव्या लागतात शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक १०८ नंबरच्या रुग्ण वाहिन्यांची गरज असल्याने त्यांनी कार्यवाही करण्यास सांगितले.
तलासरी शिवसेनेच्यावतीने रुग्णालयाच्या उणीवांबाबत निवेदन दिले. तलासरी ग्रामीण रुग्णालयातील एक्स रे कक्ष , लॅब कक्ष नेहमी बंद असतो पण मंत्र्यांना दाखवण्यासाठी तो उघडा व स्वच्छ ठेवण्यात आला होता.
या रुग्णालयात समस्या आहेत पण या बाबत अधिकारी कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून सकारात्मकच बोला अशी तंबीच असल्याने अधिकारी कर्मचार्ऱ्याच्या तोंडावर पट्टीच बांधली होती. रुग्णांची सावंत यांनी आस्थेने विचारपूस केली.
>लोकमतमधील वृत्तामुळे मंत्र्यांनी घेतली धाव
मनोर रुग्णालयात एक्सपायरी डेट होऊन गेलेली औषधे आणली आणि नंतर ती सहा दिवसांनी फेकून दिली असे वृत्त लोकमतने हेडलाईनच्या स्वरुपात प्रसिद्ध केले होते. ते वाचूनच आपण या परिसरातल्या रुग्णालयांच्या पाहणीसाठी धाव घेतली, असे सावंत यांनी सांगितले.

Web Title: The trauma center soon at Manor - Health Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.