शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुक प्रशासनच करणार मतदारांच्या वाहतुकीची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 21:24 IST

ज्येष्ठ नागरिक व अपंग मतदारांनी मागणी केल्यास संबंधित निवडणूक प्रशासनाच अशा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

ठळक मुद्देअपंग व्यक्तीसाठी देखील मतदान केंद्रांवर व्हीलचेअर ठेवणार मतदानाच्या किमान एक दिवस ही मागणी नोंदविता येणार

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी निवडणूक प्रशासनाच्या वतीने विविध उपाय-योजना करण्यात येत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक व अपंग मतदारांनी मागणी केल्यास संबंधित निवडणूक प्रशासनाच अशा मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या संदर्भांत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील निवडणूक अधिका-यांना जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. याशिवाय अपंग मतदारांच्या सोयीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक किंवा दोन व्हीलचेअर देखील ठेवण्यात येणार आहे.शहर आणि ग्रामीण भागात विविध पक्षांकडूनच जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी वाहन व्यवस्था केली जाते. परंतु मतदारांची अशी वाहतुक करणे हा एक प्रकारे संंबंधित उमेदवारांकडून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रकार समजला जातो. यामुळेच यावेळी निवडणूक आयोगानचे अशा प्रकारे संबंधित उमेदवार अथवा पक्षांकडून करण्यात येणा-या मतदारांच्या वाहतुकीवर कडक निर्बंध घातले आहेत. परंतु जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून विविध पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. तसेच थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनच ज्येष्ठ नागरिक आणि अंपग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना  करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच संबंधित निवडणूक प्रशासनच नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. याबाबत मतदान केंद्रा पर्यंत येण्यासाठी काही अडचण असल्यास संबंधित मतदारांनी जिल्हा प्रशासनाकडून विकसित करण्यात आलेल्या अ‍ॅप च्या माध्यमातून वाहन व्यवस्थेची मागणी करावी लागणार आहे. मतदानाच्या किमान एक दिवस ही मागणी नोंदविता येणार आहे. त्यानंतर संबंधित निवडणूक प्रशासन वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.--ज्येष्ठ नागरिक व अपंग मतदारांची खास काळजीकेंद्रीय निवडणूक आयोगाकडून यंदा प्रथमच ज्येष्ठ नागरिक व अपंग मतदारांची खास काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रवार अपंग व्यक्तींसा रॅम्प आणि एक ते दोन व्हीलचेअर उपलब्ध करून द्यावा लागणार आहेत. याशिवाय ज्येष्ठ मतदार, अपंग व्यक्ती किंवा आजारी व काही अडचण असणा-या मतदारांनी जिल्हा प्रशासनाने विकसित केलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून वाहन व्यवस्थेची मागणी केल्यास आम्ही ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. हडपसर विधानसभा मतदार संघात काही मतदान केंद्रावर किमान एक रिक्षा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर मागणी येईल त्यानुसार मतदारांना आणण्यासाठी रिक्षा पाठविण्यात येईल.-भारत वाघमारे, हडपसर विधानसभा मतदार संघ निवडणूक अधिकारी

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान