परिवहन आयुक्त झगडे मुंबईबाहेर शीतल उगले रायगडच्या नव्या जिल्हाधिकारी

By Admin | Updated: May 15, 2015 05:02 IST2015-05-15T05:02:28+5:302015-05-15T05:02:28+5:30

चीनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस आणि आयएएस केडरमधील अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्यांचा आदेश काढला आहे

Transport Commissioner disputes out of Mumbai Sheetal Ugale is the new Collector of Raigad | परिवहन आयुक्त झगडे मुंबईबाहेर शीतल उगले रायगडच्या नव्या जिल्हाधिकारी

परिवहन आयुक्त झगडे मुंबईबाहेर शीतल उगले रायगडच्या नव्या जिल्हाधिकारी

मुंबई - चीनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस आणि आयएएस केडरमधील अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्यांचा आदेश काढला आहे. परिवहन खत्याचे आयुक्त महेश झगडे यांच्यासह १९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश गुरुवारी जारी करण्यात आला. शीतल उगले यांची नियुक्ती रायगड जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. सचिन कुर्वे हे नागपूरचे नवे जिल्हाधिकारी असतील. नागपूरचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा हे आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असतील.

Web Title: Transport Commissioner disputes out of Mumbai Sheetal Ugale is the new Collector of Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.