ट्रान्सफार्मर खाक, गाव अंधारात
By Admin | Updated: July 20, 2016 03:50 IST2016-07-20T03:50:36+5:302016-07-20T03:50:36+5:30
तलासरी तालुक्यातील आमगाव डोंगारी गावाला वीज पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर जळल्याने या भागातील ग्रामस्थ सहा दिवस पासून अंधारात

ट्रान्सफार्मर खाक, गाव अंधारात
तलासरी: तलासरी तालुक्यातील आमगाव डोंगारी गावाला वीज पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर जळल्याने या भागातील ग्रामस्थ सहा दिवस पासून अंधारात आहेत वीज नसल्याने पाणी असूनही ते न मिळाल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहेत सहा दिवसांपासून ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी महावितरणकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर संतापलेल्या ग्रामस्थांनी तलासरी वीज वितरण कार्यालयातच ट्रान्सफार्मर बसेपर्यंत उपोषणासाठी ठिय्या दिला.
ट्रान्सफार्मर तात्काळ मागवून बसवून देतो असे अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा आधी ट्रान्सफार्मर बसवा, मग उपोषण सोडतो अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने वीज कार्यालय बाहेर तणाव निर्माण झाला या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता ट्रान्सफार्मर पालघर वरून मागविण्यात आला आहे. तो संध्याकाळ पर्यंत बसवतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण प्रथम ट्रान्सफार्मर आधी बसावा या ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु झाली. (वार्ताहर)