लोकसहभागातून होणारआरोग्य केंद्रांचा 'कायापालट'
By Admin | Updated: September 9, 2014 04:56 IST2014-09-09T04:56:05+5:302014-09-09T04:56:05+5:30
लोकसहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत कायापालट योजना राज्यभर राबवली जाणार आहे.

लोकसहभागातून होणारआरोग्य केंद्रांचा 'कायापालट'
बुलडाणा : लोकसहभागातून प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत कायापालट योजना राज्यभर राबवली जाणार आहे. याबाबत आरोग्य सचिवांनी सर्व जिल्हा परिषदांना लेखी सूचना देऊन, पश्चिम महाराष्ट्रातील मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देण्याचे आदेश दिले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्राची दूरवस्था दूर करून गावागावात आरोग्य मंदिर म्हणून उभे करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्रांच्या सौंदर्यीकरणासाठी कायापालट योजना राबवण्याचा निर्णय डिसेंबर २0१३ मध्ये घेतला होता. दोन टप्प्यात ही योजना राबवण्यासाठी कृती योजनाही आखण्यात आली होती. त्यानुसार एकूण दोन टप्प्यात ही कृती योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह ग्रामपंचायती व तालुकास्तरीय अधिकार्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यामार्फत आरोग्य केंद्रांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. कायापालट योजनेप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेडा येथील प्राथमिक अरोग्य केंद्राचे काम ८0 टक्के झाले आहे. उर्वरित कामासाठी लोकसहभाग आवश्यक आहे.