Transfers of Ashwini Joshi and Sudhakar Shinde canceled | अश्विनी जोशी, सुधाकर शिंदे यांच्या बदल्या रद्द

अश्विनी जोशी, सुधाकर शिंदे यांच्या बदल्या रद्द

मुंबई : पेट्रोकेमिकलच्या एमडी डॉ. अश्विनी जोशी यांची बदली रद्द करण्यात आली आहे. याचबरोबर डॉ. सुधाकर शिंदे यांचीही सामान्य प्रशासन विभागामध्ये झालेली बदली रद्द करण्यात आली आहे. 


राहुल द्विवेदी यांची बदली समग्र शिक्षण अभियानच्या राज्य प्रकल्प संचालकपदी झाली आहे. शंतनू गोयल यांची बदली नागपूरच्या मनरेगा आयुक्तपदी झाली आहे. एम व्ही मोहिते यांची बदली वाशिमचे नवे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. तर अजित पाटील यांची बदली सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव म्हणून झाली आहे. 

पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (एससीईआरटी) या दोन्ही संस्थांचा भ्रष्ट कारभार उघड करणार्‍या प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक अश्विनी जोशी यांचीच राज्य सरकारने ऑगस्टमध्ये तडकाफडकी बदली केली होती. अश्विनी जोशी यांना तत्काळ पदावरून मुक्त करीत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे कार्यभार सोपविण्याचे आदेश देण्यात आले होते. विशेष म्हणजे, त्यांची नव्याने कुठेही नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. आता पुन्हा नवीन नियुक्तीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Transfers of Ashwini Joshi and Sudhakar Shinde canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.