राज्यातील १६१ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या
By Admin | Updated: April 28, 2017 03:26 IST2017-04-28T03:26:39+5:302017-04-28T03:26:39+5:30
राज्यातील १६१ वरीष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी दिले आहेत.

राज्यातील १६१ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या
मुंबई : राज्यातील १६१ वरीष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी दिले आहेत.
मुंबईत कार्यरत असणाऱ्या अनेक न्यायाधीशांची बदली राज्यात इतरत्र झाली आहे. यामध्ये सध्या मुंबईत असलेले एच.एस. सातभाई यांची गोंदिया येथे, सी.एस. बाविस्कर यांची पंढरपूर, व्ही. बी. गोरे यांची नाशिक, जे. एस. माळी यांची कोल्हापूर, ए.एस. पंढरीकर यांची सातारा, डी.पी. शिंगाडे यांची अकोला, एम.एन. माळी यांची औरंगाबाद, एस.टी. डोके यांची नाशिक, बी.एम. पाटील यांची गडचिरोली येथे बदल्या करण्यात आली आहे. तर राज्याच्या इतर भागातून अनेकांची मुंबईत बदली झालीे. यात यवतमाळ येथील आर. पी. देशपांडे, नागपूर येथील ढुमणे, पुणे येथील एस. आर. यादव, धुळे येथील गणेश जाधव, जालना येथील एल. बी. जोशी, औरंगाबाद येथील एस. जे. रामगडीया, अहमदनगर येथील एम. एच. शेख, लातूर येथील एल. एस. चव्हाण, औरंगाबाद येथील वाय. के. मोरे आदींची मुंबईत बदली झाली. (प्रतिनिधी)