शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

महाराष्ट्रातील सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रविण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 23:20 IST

Transfer of Seven IAS Officers from Maharashtra : राज्य सरकारकडून सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंबई - राज्य सरकारकडून सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रविण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश आहे. प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi), आयएएस (1985) यांना अतिरिक्त मुख्य सचिव, मराठी भाषा विभाग, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे. तर आयटी विभागाचे संचालक असलेले रणजीत कुमार (Ranjit Kumar), आयएएस (2008) यांची मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे व्ही. पी फड (V.P.Phad), आयएएस (MH:2011) यांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सचिव सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

भिवंडी-निजामपूर महापालिकेचे डॉ. पंकज अशिया (Pankaj Ashiya), आयएएस (MH:2016) यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राहुल गुप्ता (Rahul Gupta), आयएएस (MH:2017) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी, गडचिरोली यांना उस्मानाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. येथे नियुक्त केले आहे. मनुज जिंदल (Manuj Jindal), आयएएस  (MH:2017) सहाय्यक जिल्हाधिकारी, अटपाली उपविभाग आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, भामरागड, गडचिरोली यांची जालना जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मिताली सेठी (Mitali Sethi), आयएएस (MH:2017) यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र