स्पर्धा परीक्षेचे पालिका विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

By Admin | Updated: July 20, 2016 02:33 IST2016-07-20T02:33:09+5:302016-07-20T02:33:09+5:30

योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही़

Training for students of competitive examinations | स्पर्धा परीक्षेचे पालिका विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

स्पर्धा परीक्षेचे पालिका विद्यार्थ्यांना प्रशिक्षण


मुंबई : योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही़ अशा विद्यार्थ्यांना हुडकून त्यांना घडविण्यासाठी महापालिकेमार्फत बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे़
अशी घोषणा शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांनी पत्रकार परिषदेतून आज केली़ महापालिकेने सुरु केलेल्या व्हर्च्युल क्लासरुमचा प्रयोग यशस्वी ठरला़ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेल्या या शिकवणीचा लाभ पालिकेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत घेतला़ त्यामुळे आता या अकादमीमार्फत इयत्ता आठवी ते दहावीमधील ५५ हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी कसे तयार व्हायचे याचे प्रशिक्षण या माध्यमातून देण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Training for students of competitive examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.