पुण्यात पोलीस बॅंड पथकाची तालीम
By Admin | Updated: June 9, 2016 22:31 IST2016-06-09T21:03:35+5:302016-06-09T22:31:17+5:30
एसआरपीएफ च्या मैदानावर उद्या पासून राष्ट्रीय पोलीस बँड स्पर्धेला सुरवात होत आहे, विविध पोलिस बँड पथके शहरात दाखल झाले आहे.

पुण्यात पोलीस बॅंड पथकाची तालीम
ऑनलाइन लोमकत
पुणे, दि. ९ - पुण्यातील 'एसआरपीएफ'च्या मैदानावर उद्यापासून राष्ट्रीय पोलीस बँड स्पर्धेला सुरवात होणार आहे. यासाठी देशातील विविध राज्यातील पोलीस बँड पथके शहरात दाखल झाली आहेत. उद्या होणा-या या स्पर्धेचे उद्धाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि सिक्कीमच्या पोलीस बँड पथकाने आज सांयकाळी बालगंधर्व चौक आणि अलका चौकात रंगीत तालीम केली. त्यावेळी येथील उपस्थितांनी याचा मनसोक्त आनंद घेतला.