प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबलवर प्रशिक्षकाचा बलात्कार

By Admin | Updated: June 29, 2014 00:43 IST2014-06-29T00:43:57+5:302014-06-29T00:43:57+5:30

रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणार्थी महिला कॉन्स्टेबलवर येथील प्रशिक्षकानेच लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Trainer Constable Trainer Rape | प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबलवर प्रशिक्षकाचा बलात्कार

प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबलवर प्रशिक्षकाचा बलात्कार

>अलिबाग : रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणार्थी महिला कॉन्स्टेबलवर येथील प्रशिक्षकानेच लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई नागेश पोपट गावडे विरुद्ध अलिबाग पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला. दरम्यान, गावडे सध्या आजारपणाच्या रजेवर असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मूळची सातारा जिल्ह्यातील ही 21वर्षीय युवती रायगड जिल्हा पोलीस भरतीत निवड झाल्यावर येथील मुख्यालयात प्रशिक्षणार्थी महिला कॉन्स्टेबल म्हणून दाखल झाली होती. त्यानंतर रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाई नागेश पोपट गावडे याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर प्रथम नागपूर येथे आणि त्यानंतर रायगड पोलीस मुख्यालयातील त्याच्या रूमवर बलात्कार केला. त्याची व्हिडीओ क्लिप करून त्याआधारे बदनामीची आणि ठार मारण्याची धमकी देऊन गेल्या दीड वर्षात अनेकदा बलात्कार केल्याची तक्रार पीडित तरुणीने अलिबाग पोलिसांत दाखल केली आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी गावडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गावडेला अटक करण्याकरिता पोलीस पथक रवाना झाले आहे. 
दरम्यान, गावडेच्या शारीरिक आणि मानसिक त्रसाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने 3 ऑक्टोबर 2क्13 रोजी आपल्या वरिष्ठांकडे तक्रार अर्ज केला. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. अखेर तिने 1 जानेवारी 2क्14 रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरदेखील अलिबाग पोलिसांनी कोणतीही चौकशी केली नाही.  (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Trainer Constable Trainer Rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.