प्रशिक्षणार्थी महिला पोलिसाचा मृत्यू
By Admin | Updated: January 25, 2015 01:46 IST2015-01-25T01:46:34+5:302015-01-25T01:46:34+5:30
खंडाळा येथील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा शुक्रवारी रात्री ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़

प्रशिक्षणार्थी महिला पोलिसाचा मृत्यू
लोणावळा : खंडाळा येथील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा शुक्रवारी रात्री ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ प्रमाणापेक्षा जास्त सराव या महिलेच्या जीवावर बेतल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. मात्र प्रशासनाने त्याचा इन्कार केला आहे.
अविक्षा नरेश डोंगरे (२५) असे मृताचे नाव आहे़ कंबर व मणक्याच्या विकाराने तसेच क्षयरोग झाल्याने तिच्यावर मागील २० दिवसांपासून ससून रुग्णालयात उपचार सुरू होते़ अविक्षाचा मृत्यू रुग्णालयात उपचारादरम्यान झाला असल्याचे खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र सेनगांवकर यांनी स्पष्ट केले. १५ नोव्हेंबर २०१४ रोजी गडचिरोली जिल्ह्यातून या प्रशिक्षण केंद्रात दाखल झाली होती़