आषाढीसाठी रेल्वेही सज्ज मिरजहून- कुर्डूवाडी- पंढरपूरसाठी विशेष
By Admin | Updated: July 7, 2016 19:42 IST2016-07-07T19:42:07+5:302016-07-07T19:42:07+5:30
आषाढीवारीसाठी रेल्वेही सज्ज झाली असून पंढरपूरकडे जाणा-या भाविकांसाठी मिरज रेल्वे स्थानकाहून विशेष गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या 11 ते 20 जुलै या कालावधीसाठी तीन

आषाढीसाठी रेल्वेही सज्ज मिरजहून- कुर्डूवाडी- पंढरपूरसाठी विशेष
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ७ : आषाढीवारीसाठी रेल्वेही सज्ज झाली असून पंढरपूरकडे जाणा-या भाविकांसाठी मिरज रेल्वे स्थानकाहून विशेष गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येत्या 11 ते 20 जुलै या कालावधीसाठी तीन विशेष गाडया सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून देण्यात आली. मिरज स्थानकावरून पंढरपूर आणि कुर्डूवाडीसाठी या विशेष गाडया असणार आहेत. भाविकांनी या गाडयांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्यरेल्वे कडून करण्यात आले आहे.
पंढरपूर-मिरज- पंढरपूर
आषाढीवारी संपल्यानंतर पंढरपूरहून मिरजकडे जाण्यासाठी 15 ते 18 जुलै या कालावधीत गाडी क्रमांक 014041 ही पंढरपूरहून सकाळी पाऊने अकरा वाजता मिरजकडे सुटेल ती दुपारी एक वाजून 5 मिनिटांंनी मिरजला पोहचेल. तर मिरजहून दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी ही गाडी पंढरपूरकडे रवाना होऊन सायंकाळी सात वाजून 05 मिनिटांनी पंढरपूरला पोहचेल. सांगोला, जतरोड,ढालगाव, कवठेमहाकाळ, साताग्रे आणि अरग या स्थानकांवर ही गाडी थांबेल.
=======
कुर्डूवाडी-मिरज-कुर्डूवाडी
या मार्गावर येत्या 11 ते 20 जुलै या कालावधीत दररोज दोन विशेष गाडया सोडण्यात येणार आहे. यात गाडी क्रमांक 01491 ही दररोज पहाटे 5 आणि सायंकाळी 5 वाजता कुर्डूवाडीहून मिरजकडे सुटेल ही गाडी पंढरपूर मार्गे जाईल. तर हीच गाडी मिरजहून दुपारी तीन वाजून 10 मिनिटे आणि रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी कुर्डूवाडीकडे रवाना होईल. या गाडीस 12 डबे असणार असून 10 जनरल डबे तर दोन स्लीपर कोच असणार आहेत.