वाहतूक पोलीस लवकरच टिष्ट्वटरवर

By Admin | Updated: June 27, 2016 04:49 IST2016-06-27T04:49:14+5:302016-06-27T04:49:14+5:30

वाहतुकीसंदर्भातील माहिती वाहन चालकांना त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी लवकरच टिष्ट्वटरवर सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

The traffic police will soon get on the spy | वाहतूक पोलीस लवकरच टिष्ट्वटरवर

वाहतूक पोलीस लवकरच टिष्ट्वटरवर


मुंबई : वाहतुकीसंदर्भातील माहिती वाहन चालकांना त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी लवकरच टिष्ट्वटरवर सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर चालकांच्या समस्याही सोडविण्यासाठीही प्रयत्न केला जाईल, अशी माहिती देण्यात आली.
मुंबई शहर व उपनगरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीबरोबरच पार्किंगसारख्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर, एखादे वाहन रस्त्यात बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास त्याची माहिती वाहतूक पोलिसांना त्वरित मिळण्यास आणि मदत पोहोचवण्यास बऱ्याच अडचणी निर्माण होतात. हे पाहता अधिकाधिक सोशल मीडियाचा वापर करण्याचा निर्णय मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. सध्या टिष्ट्वटरचा वापर सर्वात जास्त केला जात असून, टिष्ट्वटरद्वारे वाहतुकीची माहिती देता येईल का, याची चाचपणी केली जात आहे. त्याचबरोबर, चालकांच्या समस्याही यातून सोडवणे सोप्पे जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: The traffic police will soon get on the spy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.