वाहतूक पोलिसाला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न!

By Admin | Updated: June 30, 2016 00:27 IST2016-06-30T00:27:13+5:302016-06-30T00:27:13+5:30

वाशिम जिल्ह्यातील घटना; गुन्हा दाखल.

Traffic Police trying to crush the truck! | वाहतूक पोलिसाला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न!

वाहतूक पोलिसाला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न!

वाशिम : शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील पोलिस शिपायाने संशयीत ट्रक व त्यामधील धान्य मालाच्या कागदपत्रांची मागणी केली असता, ट्रकचालकाने त्यांना ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवार, २९ जून रोजी सकाळी ९:३0 च्या सुमारास घडली. शहर वाहतूक नियंत्रण शाखाधिकारी ज्योती विल्लेकर, पोलिस शिपाई विठ्ठल महाले व हवालदार रिढे हे सकाळी ९ वाजता गस्तीवर असताना काकडदाती फाट्याजवळ ट्रकचालकाला त्यांनी थांबण्यास सांगितले. यावेळी शिपाई महाले यांनी ट्रकचालकाला वाहनाची कागदपत्रे व वाहनामध्ये असलेल्या धान्य मालाच्या कागदपत्रांची मागणी केली. यावेळी ट्रक ड्रायव्हर देव्या (रा. तांदळी, ता.जि. वाशिम) याने ट्रक मालक अ. अजीज अ. सलीम याला फोन लावून घटनास्थळावर बोलाविले. ट्रकमालक अ. अजीज याने आमचा ट्रक का थांबविता, ट्रकचे कागदपत्रे दाखवित नाही, असे सांगून वाद घातला. दरम्यान, चालकाने महाले यांच्या अंगावर ट्रक घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखून सहाय्यक पोलीस निरिक्षक विल्लेकर यांनी पोलीस शिपाई महल्ले यांना बाजूला ओढल्याने महल्ले थोडक्यात बचावले. यानंतर महाले यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी महाले यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी आरोपिविरूध्द भादंविचे कलम २७९, १८६, ३५३, ३३२, २९४, ५0४, ५0६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला.

Web Title: Traffic Police trying to crush the truck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.