वाहतूक पोलिसाला मारहाण, बोरीवलीत एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 01:17 IST2016-10-08T01:17:29+5:302016-10-08T01:17:29+5:30

विनाहेल्मेट ट्रिपल सीट जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला बोरीवलीत वाहतूक पोलिसाने अडविले.

Traffic Police Strike, Borivali Police Station | वाहतूक पोलिसाला मारहाण, बोरीवलीत एकाला अटक

वाहतूक पोलिसाला मारहाण, बोरीवलीत एकाला अटक


मुंबई : विनाहेल्मेट ट्रिपल सीट जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला बोरीवलीत वाहतूक पोलिसाने अडविले. त्यामुळे त्या पोलिसाला त्याने मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री घडला. त्यानुसार बोरीवली पोलिसांनी त्याला अटक केली.
बोरीवली पोलीस ठाण्याबाहेर संध्याकाळी हा प्रकार घडला. ज्या वेळी बोरीवली वाहतूक शाखेचे विष्णू जोशी हे वाहतुकीचे नियोजन करत होते त्या वेळी एका मोटारसायकलवर बसून तीन इसम या ठिकाणी आले. मुख्य म्हणजे चालकाने त्या वेळी हेल्मेटदेखील घातले नव्हते. त्यामुळे जोशी यांनी त्यांना अडविले. तसेच विनाहेल्मेट ट्रिपल सीट गाडी चालविण्याचे कारण विचारले. त्या वेळी त्याने दुचाकीवर बसलेल्या दोघांना पळण्यास सांगितले आणि जोशींना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने जोशींना लाथ मारल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबत बोरीवली पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत कार्तिक सेठी (२४) याला ताब्यात घेतले. तो बोरीवली पूर्व परिसरात राहतो. या प्रकरणी पोलिसांनी सेठीवर गुन्हा दाखल केला असून, ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Traffic Police Strike, Borivali Police Station