वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

By Admin | Updated: September 22, 2016 03:26 IST2016-09-22T03:26:35+5:302016-09-22T03:26:35+5:30

गणेश विसर्जनादरम्यान कल्याण पूर्वेत एका पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला होता

The traffic police push | वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की


कल्याण : गणेश विसर्जनादरम्यान कल्याण पूर्वेत एका पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर, आता डोंबिवलीत एका वाहतूक पोलिसाला टेम्पोचालकाने शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून टेम्पोचालक मशीद अहमद शरीफ खान याला अटक करण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्वेतील शीळ मार्गावरील मानपाडा चौक येथून मशीद खान टेम्पो नेत होता. त्याने सीटबेल्ट लावला नव्हता. तसेच तो भरधाव टेम्पो चालवत होता. या वेळी तेथे तैनात असलेले कोळसेवाडी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार दिगंबर पवार आणि त्यांचा सहकारी ट्रॅफिक वार्डन रणजित परदेशी यांच्या हा प्रकार निदर्शसनास येताच त्यांनी टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मशीदने टेम्पो थांबवला नाही. पवार यांनी तत्काळ पाठलाग करीत टेम्पो थांबवला. त्याच्याकडे कागदपत्रे आणि परवान्याची मागणी केली. त्याचा राग आल्याने मशीदने पवार यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळ केली. (प्रतिनिधी)

Web Title: The traffic police push