वाहतूक पोलिसाला तरुणीची मारहाण

By Admin | Updated: November 21, 2015 01:51 IST2015-11-21T01:51:56+5:302015-11-21T01:51:56+5:30

एका तरुणीने सिग्नल तोडून आल्याबद्दल रोखणाऱ्या वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी या तरुणीसह

The traffic police beat the woman | वाहतूक पोलिसाला तरुणीची मारहाण

वाहतूक पोलिसाला तरुणीची मारहाण

पुणे : एका तरुणीने सिग्नल तोडून आल्याबद्दल रोखणाऱ्या वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी या तरुणीसह तिच्या मित्राला अटक केली आहे.
कल्याणी पोतेकर (२२), साहिल ढोबळे (२७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस नाईक किशोर शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे त्यांचे सहकारी प्रमोद कोंडारे आणि महिला शिपाई कुंजीर यांच्यासह नेहरूमेमोरियल हॉल चौकामध्ये वाहतूक नियमन करीत होते. दुपारी एक दुचाकीस्वार सिग्नल तोडून निघून गेला. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता शिंदे यांच्या अंगावर दुचाकी घालून तो निसटला. त्यापाठोपाठ कल्याणीनेही सिग्नल तोडला. तिला शिंदे यांनी थांबवले. गाडी बंद करण्याची विनंती करूनही तिने बंद केली नाही. त्यामुळे शिंदे यांनी चावी फिरवून गाडी बंद केली. त्याचा राग आल्याने तिने शिंदे यांच्या श्रीमुखात भडकावली.

Web Title: The traffic police beat the woman