प्रवाशांचे मोबाईल लांबवणारे जाळ्यात
By Admin | Updated: August 23, 2016 22:20 IST2016-08-23T22:20:54+5:302016-08-23T22:20:54+5:30
रेल्वे प्रवाशांकडील मोबाईल लांबवणाऱ्या टोळीतील दोघांच्या मुसक्या लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या आहेत़ अटकेतील दोघा आरोपींकडॅन ४९ हजारांचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत़.
_ns.jpg)
प्रवाशांचे मोबाईल लांबवणारे जाळ्यात
ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि.23 - रेल्वे प्रवाशांकडील मोबाईल लांबवणाऱ्या टोळीतील दोघांच्या मुसक्या लोहमार्ग पोलिसांनी आवळल्या आहेत़ अटकेतील दोघा आरोपींकडॅन ४९ हजारांचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत़.
पोलीस निरीक्षक डी़बी़सरक यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय भरत शिरसाठ, नितीन पाटील, जयकुमार कोळी, शैलेश पाटील, दीवाणसिंग राजपूत, विलास जाधव आदींच्या पथकाने आरोपी वसीम जाकीर हुसेन (वय १९) व समीर मेहमूद शहा (वय २०, ईदगाह, खडका, भुसावळ) यांना मंगळवारी दुपारी अटक केली़ आरोपींकडून विविध कंपन्यांचे ४९ हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त करण्यात आले़ प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना हे मोबाईल परत देण्यात येणार आहेत़ तपास दिवाणसिंग राजपूत करीत आहेत़.
हावडा व पुरी एक्स्प्रेस पुन्हा चोरीने खळबळ
१२३२१ अप हावडा एक्स्प्रेसमधील प्रवासी भूमेश्वर श्रीमन ब्राह्मण (नारायणपूर) यांच्या मालकीची पर्स चोरट्यांनी लांबवली़ त्यात दोन मोबाईल, चांदीची अंगठी, पाच हजार रोख असा सात हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल होता़ ५ आॅगस्ट रोजी ही घटना घडली़ दुसऱ्या घटनेत प्रवासी विशाल आमोदकर (बडोदा) हे जळगाव स्थानकावर अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसमध्ये २१ रोजी रात्री १०़३० वाजता चढत असताना २० हजार २४० रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला़.