खडी वाहून गेल्याने मुंबई - पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प
By Admin | Updated: September 18, 2015 16:46 IST2015-09-18T16:45:38+5:302015-09-18T16:46:40+5:30
लोणावळ्याजवळ रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने मुंबई - पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही दिशेकडे जाणा-या लांबपल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे.

खडी वाहून गेल्याने मुंबई - पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १८ - लोणावळ्याजवळ रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेल्याने मुंबई - पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही दिशेकडे जाणा-या लांबपल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरही डोंगरावरुन चिखलमिश्रीत पाणी वाहून आल्याने एक्सप्रेस वेवरील वाहतूकही संथगतीने सुरु आहे.
शुक्रवारी राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून मुसळधार पावसामुळे पुणे - लोणावळा दरम्यान कान्हेजवळ रेल्वे रुळाखालील खडी वाहून गेली आहेत. याचा फटका दोन्ही दिशेला जाणा-या लांबपल्ल्याच्या गाड्यांना बसण्याची चिन्हे आहेत. मुंबई - हैदराबाद एक्सप्रेससह अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.
एक्सप्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ डोंगरावरुन चिखल व माती मिश्रीत पाणी रस्त्यावर वाहून आल्याने वाहतूक मंदावली आहे. रेल्वेपाठोपाठ महामार्गावरील वाहतूक मंदावल्याने पुण्याकडे जाणा-या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.