कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
By Admin | Updated: June 27, 2016 21:06 IST2016-06-27T20:25:19+5:302016-06-27T21:06:47+5:30
गेल्या दीड तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. चिपळूनजवळ राजधानी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जवळपास
कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - गेल्या दीड तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
चिपळूनजवळ कामथे बोगद्यात दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे जवळपास दीड तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, पनवेलमधून दुसरं इंजिन पाठविण्यात आले असून ते चिपळूनला पोहचल्यानंतरच कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत होणार असल्याचे समजते.