इगतपुरीजवळ मालगाडी रुळांवरून घसरल्याने वाहतूक ठप्प
By Admin | Updated: July 6, 2015 08:27 IST2015-07-06T08:24:58+5:302015-07-06T08:27:56+5:30
इगतपुरी स्थानकाजवळ मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याने अनेक एक्स्प्रेस खोळंबल्या असून नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

इगतपुरीजवळ मालगाडी रुळांवरून घसरल्याने वाहतूक ठप्प
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - इगतपुरी स्थानकाजवळ मालगाडीचे डबे रुळावरून घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मालगाडीचे तीन डबे रुळांवरून घसरले. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या असून मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
या घटनेची माहिती मिळताच इगतपुरीहून मदतपथक घटास्थळी रवाना झाले आहे, मात्र रुळांवरून डबे हटवून वाहतूक पूर्ववत करण्यास बराच अवधी लागू शकतो, अशी माहिती संबंधित अधिका-यांनी दिली आहे. आठवड्याच्या सुरूवातीसच अशी घटना घडल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन कराव लागत आहे.